होस्टिंग हि खूप आवश्यक आणि महत्वाची सेवा आहे यामुळे आपण इंटरनेट वर आपली वेबसाईट होस्ट करू शकतो, आणि या सर्व्हर मध्ये वेबसाईट च्या सर्व सुरक्षित साठवून ठेवल्या जातात.
बर्याचदा खूप लोक होस्टिंग सर्व्हर कडे दुर्लक्ष करतात, परंतु वेबसाईट ला यशस्वी बनवण्यासाठी होस्टिंग हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तसेच ही अशी सेवा आहे जी वेबसाईट ला इंटरनेट शी जोडण्याचे काम करते.
ज्या सर्व्हर मध्ये वेबसाईटचा संपूर्ण डेटा आणि फाइल्स साठवून ठेवल्या जातात त्याच Storage Space ला वेब होस्टिंग असे म्हणतात.
Article Source - वेब होस्टिंग बद्दल माहिती सविस्तर माहिती वाचा.
होस्टिंग चे प्रकार | Type of Web Hosting in Marathi
शेयर्ड होस्टिंग मध्ये वेबसाईट ला होस्ट करणे सोपे असते. शेयर्ड होस्टिंग सर्व्हर ची किंमत कमी असते व लहान वेबसाईट साठी उत्कृष्ट सर्व्हर आहे.
व्हीपीएस होस्टिंग यामध्ये एका सर्व्हर स्पेस ची वेगवेगळ्या सर्व्हर स्पेस मध्ये विभागणी केली जाते. आणि त्या सर्व्हर स्पेस वर केवळ वेबसाईट मालकाचा च अधिकार असतो. व्हिपीएस होस्टिंग शेअर्ड होस्टिंग च्या बाबतीत जास्त सुरक्षित असते
3. डेडिकेटेड सर्व्हर
डेडिकेटेड सर्व्हर मध्ये वेगवेगळ्या वेबसाईट साठी वेगवेगळे सर्व्हर प्रदान केले जाते यामध्ये एका वेबसाईट साठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध असतात.
क्लाउड होस्टिंग सर्व्हर मध्ये अनेक प्रकारचे सर्व्हर एकत्र मिळवून एक मोठे शक्तिशाली सर्व्हर तयार केले जाते, हे सर्व्हर मध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी हाताळण्यास सक्षम असते. क्लाऊड होस्टिंग विकत घेण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.
अश्या प्रकारे वेब होस्टिंग काय आहे? व होस्टिंग च्या प्रकार बाबत माहिती जाणून घेतली तुम्हाला नक्कीच हि माहिती आवडली असेलच.
No comments:
Post a Comment