Monday, 16 January 2023

IPO म्हणजे काय? आणि IPO बद्दल संपूर्ण माहिती

 IPO चे संक्षिप्त रूप म्हणजेच फुल्ल फॉर्म Initial Public Offering यालाच मराठी मध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफर असे म्हटल्या जाते. एखाद्या कंपनी सार्वजनिक जनतेसाठी आपल्या कंपनीचे भाग म्हणजेच शेअर ऑफर करते तेव्हा ती कंपनी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होण्यास पात्र होते.


इनिशिअल पब्लिक ऑफरिंग या प्रक्रियेमध्ये एखादी खाजगी कंपनी तिचे शेअर्स सार्वजनिक जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना विकू शकते. यामध्ये ज्या कंपनी ला स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध व्हायचे आहे ती कंपनी अश्या प्रकारचा निर्णय घेते.  


अश्याच प्रकारची इनिशिअल पब्लिक ऑफेरींग या बद्दल आणखी माहिती हवी असेल तर IPO बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती या ब्लॉग पोस्ट वर क्लिक करा. 

आईपीओ ची गरज का असते? । IPO Information in Marathi


जेव्हा एखाद्या खाजगी कंपनी च्या मालकाला कंपनी चा आणखी विस्तार व्हावा असे वाटते तेव्हा कंपनीला इतर ठिकाणांमध्ये विस्तार करण्यासाठी पैशाची गरज भासते अशा परिस्थितीत सार्वजनिक लोकांसाठी आपल्या कंपनी चे भाग IPO च्या स्वरूपात जारी करते. आणि या IPO मधून कंपनी मोठ्या प्रमाणात निधी गोळा करते आणि विस्तार करते. 


जर कंपनीने IPO द्वारे निधी गोळा केला तर तो पैसा कोणालाही परत करावा लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे व्याजही द्यावे लागणार नाही. केवळ कंपनी ला जो काही नफा लाभ होईल त्यातील काही हिस्सा भागधारकाला द्यावे लागतात. 


कोणतीही कंपनी जी IPO जरी करते त्या कंपनीला 'Issuers' असे म्हटल्या जाते, आणि कंपनी स्टॉक मार्केट मध्ये सूचिबद्ध झाल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्स ची  स्टॉक मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री सुरू होते. नंतर IPO मध्ये जेथे शेअर्स विकले जातात त्याला प्राइमरी मार्केट म्हणतात. आयपीओ आणण्यापूर्वी कंपनी प्रॉस्पेक्टस जारी करते. प्रॉस्पेक्टसमध्ये, कंपनीच्या IPO बद्दल सर्वात लहान ते सर्वात मोठी माहिती उपलब्ध आहे.


IPO Type in Marathi | आईपीओ चे प्रकार 


१. फिक्स प्राईस इश्यू । FIX PRICE ISSUE


फिक्सड प्राइझ इश्यू (FIX PRICE ISSUE) मध्ये कंपनी इन्व्हेस्टमेंट बँकेसोबत चर्चा करून शेअरची म्हणजेच भागाची किंमत निश्चित करते आणि त्याच किंमतीला शेअर्स हे सार्वजनिक जनतेसाठी जरी केले जातात. 


२. बुक बिल्डिंग इश्यू । BOOK BUILDING IPO


BOOK BUILDING IPO यामध्ये कंपनी कडून एक किंमत असलेली रेंज ठरवली जाते. मार्केट मधून त्यांना काय प्रतिसाद येतो हे ते बघतात आणि त्यानंतर ते एक प्राइझ बँड ठरवतात. आणि या ठरवलेल्या प्राइस बँडमधून सदस्यता म्हणजेच IPO घेतात.


जर IPO ची किंमत सर्वात कमी असेल तर त्याला Floor Price म्हणतात आणि सर्वात जास्त किंमत असेल तर त्याला Cap Price असे म्हटले जाते.


जर तुम्ही सुद्धा IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर IPO म्हणजे काय? आणि याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मराठी स्पिरिट साईट ला नक्की भेट द्या.  


No comments:

Post a Comment

Social Media बद्दल सविस्तर माहिती

सोशल मीडिया हा एक प्रकारचा एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे.  सोशल म...