NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. यालाच डिजिटल क्रिप्टोग्राफिक टोकन असे सुद्धा म्हटले जाते. आणि तसेच या NFT तंत्रज्ञानामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

NFT हे एक प्रकारचे डिजिटल टोकन आहे ज्या मध्ये आभासी असलेल्या गोष्टींची खरेदी आणि विक्री केली जाते. या खरेदी आणि विक्री मध्ये कोणत्याही वस्तूचा किंवा मालाचा समावेश होत नाही. यामध्ये केवळ दुर्मिळ आणि आभासी वस्तू खरेदी केल्या जातात. क्रिप्टोकरन्सी प्रमाणेच NFT सुद्धा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
NFT या तंत्रज्ञानात Ethereum ERC 721 या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याच्याच साहाय्याने तुम्हाला NFT टोकन दिले जाते आणि याच माध्यमातून तुमचे टोकन व्हेरिफाय देखील केले जाते. जर तुम्ही एखादा फोटो, डिजिटल आर्टस्, व्हिडीओ अश्या कोणत्याही गोष्टीचे एक वेळेस NFT टोकन घेतले तर आयुष्यभर त्या गोष्टीचा मालकी हक्क तुम्हाला मिळतो. NFT ला एक डिजिटल स्वरूपाची संपत्ती सुद्धा समजले जाते.
Non-Fungible Token हि सुविधा पूर्णपणे फ्री आहे, तसेच यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान चा वापर होत असल्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे आपला असलेला डेटा कोणतीही दुसरी व्यक्ती वापरू शकत नाही. येत्या काळात NFT चा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आणि पुढच्या काळात सुद्धा NFT खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाईल. म्हणूनच आपल्या कलेसाठी, डिजिटल फाइल्स साठी NFT हे सर्वोकृष्ट प्लॅटफॉर्म असेल यात शंका नाही.
अश्या प्रकारे तुम्हाला हि NFT मध्ये खरेदी आणि विक्री करायची असेल तर तुम्हाला त्या बद्दल संपूर्ण माहिती आत्मसात करावी लागेल, म्हणून आम्ही आमच्या ब्लॉग पोस्ट वर NFT बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे.
No comments:
Post a Comment