Friday, 20 January 2023

डोमेन नेम च्या विविध प्रकाराबद्दल माहिती

डोमेन हे वेबसाईट चे नाव असते जे लोक त्यांच्या वेब ब्राउझर मध्ये टाईप करतात, आणि आपल्या साईट वर येतात. या आधुनिक जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेबसाईट इंटरनेट वर रजिस्टर होत आहेत, परंतु या सर्व वेबसाईट ना ओळखणे कठीण असते म्हणून अशा वेबसाईट ला एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते त्यालाच डोमेन असे म्हणतात. 

डोमेन नेम चे प्रकार कोणकोणते आहेत? | Domain Name Type in Marathi

  1. Top Level Domain | TLD

टॉप लेवल डोमेन नेम चा जास्त प्रमाणात वापर होत असतो आणि सर्च इंजिन मध्ये सुद्धा या प्रकारच्या डोमेन नेम ला खूप महत्वाचे मानले जाते. म्हणून च  हे डोमेन नाव खूप लोकप्रिय झालेले आहे.

टॉप लेवल डोमेन म्हणजेच TLD ची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. 

  • .com :- Commercial

  • .net :- Networking

  • .org :- Organization

  • .gov :- Government

  • .edu :- Educational


  1. Country Code Top Level Domain | CcTLD

देश कोड उच्च स्तरीय डोमेन चा वापर केवळ देशामध्ये राहणारे लोक करू शकतात. काही CcTLD डोमेन नाव ची उदाहरणे पाहूया. 

  • .in :- India

  • .us :- United States

  • .ru :- Russia

      
         3. Subdomain

सबडोमेन या डोमेन ला थर्ड लेवल डोमेन म्हणून सुद्धा ओळखले जाते, तसेच हा डोमेन चाच एक भाग आहे.जसे कि, marathispirit.com हे मुख्य डोमेन नेम आहे आणि त्याचे सबडोमेन blog.marathispirit.com असे तयार केले जाते.


जर तुम्हाला डोमेन नेम बद्दल संपूर्ण माहितीची आवश्यकता असेल तर आमची ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा


No comments:

Post a Comment

Social Media बद्दल सविस्तर माहिती

सोशल मीडिया हा एक प्रकारचा एकमेकांशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे.  सोशल म...