डिजिटल मार्केटिंग (विपणन) म्हणजे नक्की काय?
डिजिटल मार्केटिंग मध्ये वस्तू व सेवांची मार्केटिंग केल्या जाते, आपल्या वस्तू व सेवा ह्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला त्याची मार्केटिंग करावी लागते. हि मार्केटिंग डिजिटल म्हणजेच इंटरनेटच्या साहाय्याने केली जात असल्यामुळे आपल्या वस्तू व सेवा ची माहिती लवकर ग्राहकांना मिळते.
तसेच आपण वस्तू व सेवांवर दिलेल्या विविध ऑफर्स सुद्धा ग्राहकांना कळतात. व ग्राहक आपल्या वस्तू व सेवां कडे आकर्षित होतात. अशाच प्रकारे डिजिटल मार्केटिंग चा खूप फायदा होत असतो. तर चला, या पोस्ट मध्ये आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? (What is Digital Marketing in Marathi) त्याचे विविध प्रकार या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मधून जाणून घेऊया.
👉👉व्याख्या👈👈
एखाद्या वस्तू किंवा सेवांची इंटरनेट च्या साहाय्याने केली जाणारी मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.
डिजिटल मार्केटिंग (विपणन) म्हणजेच ऑनलाईन इंटरनेट च्या साहाय्याने वस्तूंची किंवा सेवांची केली जाणारी मार्केटिंग (जाहिरात) होय. डिजिटल मार्केटिंग विपणन म्हणजेच ऑनलाईन इंटरनेट च्या साहाय्याने वस्तूंची किंवा सेवांची केली जाणारी मार्केटिंग होय.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार ( Types of Digital Marketing)
SEO | सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशन
SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमिझेशन होय, याचा वापर करून आपण आपल्या वेबसाईट ला कोणत्याही सर्च इंजिन वरती रँक करू शकतो. जर आपण वेबसाईट चा SEO चांगल्या प्रकारे केला तर आपल्या साईट वर मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवून वेबसाईट ला सर्च इंजिन वर रँक करू शकतो.
SMM (सोशल मीडिया मार्केटिंग)
सोशल मीडिया ला डिजिटल मार्केटिंगचा एक महत्वाचा भाग म्हटल्या जाते, सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ची माहिती अगदी काही कालावधीतच हजारो लोकांना देऊ शकतो. सोशल मीडिया मध्ये Facebook, Instagram, Linkedin, Twitter इत्यादी सोशल मीडिया वेबसाईट चा समावेश होतो.
E-mail (इ मेल मार्केटिंग)
E-mail Marketing हा देखील एक डिजिटल मार्केटिंग चाच प्रकार आहे, यामध्ये ई-मेल च्या साहाय्याने ग्राहकांना प्रॉडक्ट्स् किंवा सर्व्हिसेस ची माहिती दिली जाते. ई-मेल च्या साहाय्याने ग्राहकांना विविध प्रकारचे आकर्षक ऑफर्स ची सुद्धा माहिती प्रदान केल्या जाते.
Affiliate Marketing
या मार्केटिंग मध्ये तुम्ही एखादया कंपनीच्या प्रॉडक्ट्स् सर्विसेस ची विक्री करून कमिशन मिळवू शकता. बऱ्याच अश्या कंपन्या आहेत, जे Affiliate Marketing ची सुविधा प्रोव्हाइड करतात. अश्याच प्रकारे ऑनलाईन पद्धतीने प्रॉडक्ट्स् विक्री करणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग करने होय.
PPC (Pay Per Click)
PPC म्हणजे Pay Per Click यामध्ये पेड जाहिरात सर्व्हिस दिली जाते. या सर्व्हिस मध्ये गूगल किंवा इतर सर्च इंजिन वर जाहिराती प्रदान केल्या जातात, आणि या जाहिराती वर जेवढे लोक क्लिक करतील तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील.
अशा प्रकारे तुम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय या बद्दल जाणून घेतले आहे. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर या लिंक वर क्लिक करा.
डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग आणि नवनवीन टेकनॉलॉजि ची माहिती हवी असल्यास आमच्या साईट भेट द्या - https://www.marathispirit.com/